औरंगाबाद हे शहर महाराष्ट्र राज्यातील एक महत्वाचे ऐतिहासिक शहर आहे. या शहराला खडकी या नावाने ही ओळखले जाते. सध्या या शहराला संभाजीनगर या नावाने संबोंधले जाते. हे शहर मराठवाडा विभागाचे मुख्यालय आहे. शहराचा विस्तार अलिकडे फार मोठया प्रमाणात झाला आहे. मराठवाडयातील विशेषत : महाराष्ट्रातील एक औद्योगिक शहर म्हणून ओळखले जाते. औदयोगिक विकासाबरोबरच शैक्षणिक विकासातही हे शहर अग्रगणी आहे. शहरात मोठ मोठे नामांकित महाविदयालय, तसेच उदयोगधंदे उदयाला आले आहेत. वाळूज, पंढरपूर, शेंद्रा या औदयोगिक वसाहती या शहरात आहेत.
शहराचेे शैक्षणिक क्षेत्रात मोठे योगदान आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विदयापीठ या शहरात आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरानी स्थापन केलेले मिलिंद कॉलेज ही येथे आहे. देवगिरी कॉलेज, सरस्वती भुवन, जामिया मिलिया कॉलेज, तसेच इतर वैदयकीय शिक्षण देणारी नामांकित असे काॅॅॅॅलेजस या शहरात आहेत.
शैक्षणिक क्षेत्राबरोबरच ऐतिहासिक वारसा ही खुप मोठा आहे. श्री बाळकृष्ण महाराज व निपटनिरंजन यांची समाधीमुळे हे शहर प्रसिध्द आहे. डॉ. बाबासाहेब आंबेेेडकर विदयापीठातील ऐतिहासिक संग्रहालय खुप जुुने व प्रसिध्द आहे. शहराच्या मध्यवर्ती बसस्थानकाच्या काही अंतरावर अलिकडे निर्माण करण्यात आलेले पर्यटन स्थळ म्हणजे सिध्दार्थ गार्डन (सिध्दार्थ उदयान ) मनोरंजनासाठी खुप प्रसिध्द आहे. तसेच शहरात श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय आहे.
शहरातील प्रेक्षेणिय व ऐतिहासिक स्थळे
बिबिका मकबरा :
औरंगाबाद शहराचे नाव ज्या ऐतिहासिक वास्तूूशी जुळले आहे ती वास्तूू म्हणजे बिबिका मकबरा. ही जगप्रसिध्द वास्तू औरंगाबाद शहराचे मोठे वैशिष्टये आहे. बिबिका मकबरा म्हंटल की औरंगाबाद हे नाव समोर येत. बिबिका मकबरा ही वास्तू मोगलसम्राट औंरगजेब पुत्र अजमशहा यांनी आपल्या आईच्या स्मरणार्थ हा बांधली आहे. या महालात औरंगजेबाची पत्नी रब्बीया दुर्रानीची कबर आहे. हे ठिकाण शहराच्या मध्यवर्ती बसस्थानकापासून केवळ दोन किमी अंतरावर आहे. ऐतिहासिक वास्तू चा उत्तम नमुना पहावयास मिळतो.
सोनेरी महल :
औरंगाबाद मधील पर्यटनाचे महत्वाचे ठिकाण म्हणून समजले जाते ते सोनेरी महल. हा सोनेरी महल डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विदयापीठाच्या परिसरात आहे. या महालातील चित्रेे सोन्याच्या पाण्याने सजवली असल्याने यास सोनेरी महल म्हणून ओळखले जाते.
छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय :
औरंगाबाद महानगरपालिकेने छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालयाची निर्मिती केली आहे. सुमारे ५०० वर्षापुर्वीच्या शिवाजी महाराजांच्या वस्तूं येथे पाहवयास मिळतात. अनेक पर्यटक या ठिकाणाला भेट देतात. शिवाजी महाराजांच्या स्मृती डोळयाने पाहताना खुप आनंद होतो.
पाणचक्की :
सुमारे चारशे वर्षापुर्वीची पानचक्की औरंगाबाद शहराचे वैशिष्टये आहे. या पानचक्कीच्या मदतीने दळण दळले जात असत. औरंगाबाद शहरापासून काही अंतरावर असलेल्या जटवाडा पर्वतातून भुमिगत कालव्याव्दारे पाणी या पानचक्कीसाठी आणले. असे सांगितले जाते की, या पानचक्कीची निर्मिती सुफी संत बाबाशहा मुसाफिरने इ.स. १६२४ मधे बांधण्यास सुरुवात केली. त्यांच्या अथक प्रयत्नातून ही पानचक्की १६४४ साली बांधून पुर्ण झाली. पानचक्कीच्या वरच्या भागात एक मातीचे चाक आहे. या पानचक्कीला योग्य पध्दतीत पाणी पुरवठा झाले तर ती आजही चालते. पाण्याच्या हौदाजवळ भले मोठे वडाचे झाड आहे. हे झाड शहाशे वर्षापुुुुुुर्वीचे आहे. असे सांगितले जाते. येथच सुफी संत बाबाशहा ची समाधी आहे. इतिहासकारांसाठी हे एक उत्तम दर्जाचे ऐतिहासिक भौतिक साधन समजले जाते. तसेच पर्यटकांसाठीही खुप महत्वाचे ठिकाण आहे.
सिध्दार्थ उदयान व प्राणिसंग्रहालय :
औरंगाबाद शहराच्या मध्यवर्ती बसस्थानकाच्या परिसराजवळच मराठवाडयातील एकमेव असे प्राणिसंग्रहालय व उदयान औरंगाबाद शहरामध्ये आहे. या उदयान व प्राणिसंग्रहालयाच्या सिध्दार्थ गार्डन व प्राणीसंग्रहालय असे नांव देण्यात आले आहे. हे उदयान १९८५ साली पर्यटकांच्या मनोरंजनासाठी निर्माण करण्यात आले. या उदयानात गौतमबुध्दाचा एक पुतळा बसवण्यात आला आहे. येथे विविध पक्षी व प्राणी आपणांस पहावयास मिळतात. उदयानातील वातावरण अतिशय रमणीय आहे.
वाळूज औदयोगिक परिसर (MIDC)
महाराष्ट्र राज्यातील औदयोगिक शहर म्हणून औरंगाबाद शहराची ओळख आहे. या शरातील वाळूज हा परिसर औदयोगिक परिसर आहे. या परिसरात औषध कंपनी पासून ते जिवनावश्यक अशा अनेक कंपनी येथे आहेत. श्रेया लाईफ लाईन्स औषध कंपनी,घडी डिटर्जंट कंपनी, अशोक लिलण्ड, स्टारलाईट टेेेेक्नाॅॅलॉजी कंपनी अशा अनेक कपनी येथे आहेत.
अशा पदध्दतीने औरंगाबाद शहर महाराष्ट्र राज्यातील परिपुर्ण असे शैक्षणिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक, औदयोगिक वारसा जपणारेे आहे.
✿अंतर
मुंबईहुन - 362 किमी
पुण्याहून - 250 किमी
शिर्डीहुन - 130 किमी
शेगावहून - 220 किमी
नागपूूरहून - 477 किमी

0 Comments