संतश्रेष्ठ एकनाथ महाराजांच्या जन्माने पावन झालेले पैठण हे गांव प्राचीन काळापासून दक्षिण काशी म्हणून ओळखले जाते. सातवाहन काळात या गावाचे नाव प्रतिष्ठाण असे होते. सातवाहन काळातील राजधानी असलेले पैठण भारताच्या इ्रतिहासात खुप मोलाचे आहे. वारकरी संप्रदाया बरोबरच महानुभाव संप्रदायाचाही वारसा या गावाने जपला आहे. महानुभाव पंथाचे आदयप्रवर्तक संत चक्रधर स्वामी यांचे ही वास्तव्य काही काळ पैठण येथे होते. महाराष्ट्र राज्याच्या पर्यटन क्षेत्रामध्ये पैठणचे नाव अगदी उत्साहाने घेतले जातेे. पैठण ही संत एकनाथ महाराजांची जन्मभुमी व कर्मभुमी म्हणूनओळखले जाते.
गोदावरी नदीच्या काठावर वसलेले प्राचीन गांव. संत एकनाथ महाराजांनी गोदावरीच्या पात्रात तप्त वाळूत विव्हळणारे छोटेसे बालक उचलून घेतले. तो प्रसंग याच परिसरातला. मनाला चटका लावून जातो.जातो. ते गोदावरीचे विस्तिर्ण पात्र पाहावेेसे वाटते. पैठण ऐतिहासक व सांस्कृतिक व धार्मिक वारसा असलेले दक्षिण भारतातील महत्वाचे ठिकाण आहे. येथेच संत ज्ञानेश्वरांनी रेडयामुखी वेद वदविले. हिंदू धर्मियांबरोबरच जैन धर्मियांचेही महत्वाचे तिर्थक्षेत्र समजले जाते. आधुनिक काळात प्रत्येक महाराष्ट्रीय कुटुुबाचे या पैठण शहराशी नाते जोडणारी पैठणी साडी याच ठिकाणी बनवली जाते.
|| पैठणचा शालू आज मला आणा गडे पतीराज || हया ओळी सहज ओठावर येतात.
प्रेक्षेणिय व ऐतिहासिक ठिकाणे
✽ संत एकनाथ महाराज यांचा वाडा
पैठण येथील महत्वाचे ठिकाण म्हणजे संत एकनाथ महाराजांचा वाडा. आज या वाडयाचे रुपांतर मंदिरात झालेले आहे.
✽ संत एकनाथ महाराज समाधीस्थान
✽ दत्त मंदिर
✽ नृसिंह मंदिर
✽ नवनाथ मंदिर
✽ तीर्थ खांब
✽ संत ज्ञानेश्वर उदयान
पैठण येथील नाथसागराच्या पाण्याचा वापर करून सुदंंर असे संत ज्ञानेश्वर उदयान तयार करण्यात आले आहे. हे उदयान वृंदावन उदयान म्हैसूर च्या धर्तीवर आहे. संगणकावर आधारीत येथील नाचणारी कारंजे विशेष आहेत. रात्रीच्या अंधारात येथील कारंजे पाहताना खुप आनंद वाटतो.
✽ नाथसागर
संत एकनाथ महाराजांच्या जन्माने पावन झालेल्या या पैठण नगरीत महत्वाचे योगदान नाथसागराचे आहे. गोदावरी नदीच्या विस्तिर्ण पात्रावर नाथसागराची निर्मिती करण्यात आलेली आहे.
✽ संत एकनाथ महाराज समाधीस्थान

0 Comments