Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

Responsive Advertisement

श्री. महाकाली- चंद्रपूर

         धु्रपत माईच्‍या नावावे हार बोला |  शिवशक्‍तीच्‍या नावान हार बोला |  असा भक्‍तीचा गरज होतो ते ठिकाण म्‍हणजे चंद्रपूर. चंद्रपूरची महाकाली आई  जनसामान्‍याची माय  आहे. या माईच्‍या दर्शनाला जाण्‍याची माझी खूप दिवसापासूनची इच्‍छा होती. तसे पाहता माझया लहानपणापासूनच महाकालीचा महिमा ऐकूण होतो. गावात देवकरीण बाई धुरपत मायीची वारी म्‍हणत याययची. हातात कडूनिंबाच्‍या झाडाची फांदी, पितळेच्‍या डब्‍यात भंडार म्‍हणजे हळद, हिरवं लुगडं नेसलेेेली, अंगावर लाल रंगाची शाल, असा तिचा पेहराव असायचा. माझी माय किंवा घरातील कोणीही सदस्‍य असो. धुरपतमायीच्‍या देवकरणीला  डब्‍यात किंवा वाटीत घरातील ज्‍वारी दान करायचं. देवकरीनबाई कपाळाला हळद म्‍हणजे भंडार लावायची. डोक्‍यावरून कडूनिंबाच्‍या हिरव्‍या फांदया फिरवायची. खूप समाधान वाटायचे. माझी माय नेहमी धुरपतपायीची गाणी गुणगुणत असाची. एकंदरीत माझया नांदेड  जिल्‍हयातील जनसामान्‍य माणूस महाकालीचा भक्‍त आहे. हे पूर्वी पासून  माहित आहे.  चैत्र पौर्णिमेला व नवरात्र मध्‍ये येथे मोठया प्रमाणात भक्‍त गण जातात. 

        खूप दिवसापासूनची मनात असलेली इच्‍छा पूर्ण झाली. चंद्रपूर ची महती आहे ती महाकाली च्‍या पावन पदस्‍पर्शाने. दिवाळीच्‍या सुट्टीत चंद्रपूर जाण्‍याचा बेत आखला. दिवाळी झाली. हो नाही म्‍हणत चंद्रपूर जाण्‍याचे ठरले. दिनांक 30 ऑक्‍टोबर, 2022 रोजी  नांदेड ला माझा मित्र दयानंद बसवंतेकडे सहकुटूंब पोहचलो. रात्रीचा मुक्‍काम नांदेडला करून 31 ऑक्‍टोबरला चंद्रपुुुुरला निघालो. जाण्‍याचा मार्ग माहूूर मार्गे निवडला. 1998 साली माहूूूूूूरमध्‍ये 8 ते 10 दिवस राहिलो होतो. पुन्‍हा माहूरला जाण्‍याचा योग आला. माहूर हे नांदेड जिल्‍हयातीलच नव्‍हे तर महाराष्‍ट्र राज्‍यातील पर्यटन व धार्मिक स्‍थळ आहे. देवीच्‍या साडेतीन पीठापैकी एक पीठ समजले जाते.  येथील रेणुकामातेचे मंदिर प्रसिध्‍द तिर्थक्षेत्र आहे. याचबरोबर सतीअनुसया माता मंदिर, श्री. दत्‍त मंदिर, परशुराम मंदिर , देवदेवश्‍वर, पांडवलेणी, जवळच वजरा येथे शेख फरीद दर्गा व प्रसिध्‍द असा रामगड नावाचा किल्‍ला इत्‍यादी प्रसिध्‍द स्‍थळे आहेत. प्राचीन काळापासून माहूर हे तिर्थक्षेत्र आहे.  रेणूूूकामाता ही प्राचीन सम्राट प्रसेनजित राज्‍याची कन्‍या आहे. असे सांगितले जाते.  सगळा परिसर डोंगरद-यांनी व घनदाट वृक्षांनी भरलेला असतो. 

     घरुन सकाळी सात वाजता निघाल्‍यावर  9 वा. वारंगा फाटयाला प्रसिध्‍द खिचडीचा आस्‍वाद घेतला. लहानपणापासून ऐकूण होतो. वारंग्‍याची खिचडी प्रसिध्‍द आहे असे म्‍हणतात. तसा खिचडी आणि भजे हा पदार्थ नांदेड जिल्‍हयात  सर्वत्र खायला मिळतो. त्‍याची प्रत्‍येक ठिकाणच अस्तित्‍व व चव विशेषच असते. जशी वारंग्‍याची खिचडी. 

     जवळपास पाच तासाचा प्रवास करून बारा सव्‍वा बाराला माहूरला पोहचलो. धनोडा फाटयावरून माहूरकडे वळलो.  पैनगंगा नदी पार केली. घाट चढून वर गेल्‍यावर माहूर शहराचे दर्शन झाले. माहूर हे गाव उंचीवर आहे. हे लक्षात आले. पूर्वी  आठ ते दहा दिवस राहिलेला सर्व प्रसंग आठवला.  1998 चे माहूर व आताचे माहूर यात खूप फरक जाणवला. गडावर जाणा-या रस्‍त्‍याचे रुंदीकरण हे विशेष आहे. पुर्वीचे अपघातप्रवण वळणे व अरुंद रस्‍ते आता नाहीत. प्रथम रेणूका मातेचं दर्शन घेतलं. देवीच्‍या तांबूलाचा आस्‍वाद घेतला. तेेेथून श्री. दत्‍त मंदिर येथे पेाहचलो. श्री. दत्‍ताचे दर्शन व तेथील महाप्रसाद घेतला. तिर्थक्षेत्रावरील महाप्रसाद एक विशेष आस्‍वाद असतो. तो महाप्रसाद  खायला मला खुप आवडतो. श्री. दत्‍ताचे दर्शन झाल्‍यावर माता सती अनुसयाचे  दर्शन घेेेेेतले. माता अनुसयाच्‍या शिखरावरून माहूरचा घनदाट जंगल दृष्‍टीपथात येतो. खुप खुप नययरम्‍य परिसर मनाला भावताेे.......... 

      चार साडेचारला माहूरहून चंद्रपूरच्‍या दिशने निघालोत. गड उतरून खाली आल्‍यावर सारखणी हून  पांढरकवडा  मार्गे चंद्रपूर जाण्‍याचे ठरवले. साडेपाच वाजता सारखणी फाटयाला चहा घेतला तिथून पुढे निघालोत. सहा साडेसहाला उनकेश्‍वरला पोहचलो. गरमपाण्‍यासाठी प्रसिध्‍द असलेले नांदेड जिल्‍हयातील ठिकाण म्‍हणजे उनकेश्‍वर. महादेवाचे खुप जुने मंदिर आहे. सोमवार असल्‍याने महादेवाची आरती करण्‍याचे भाग्‍य लाभले.  यापुर्वी 1996 साली सातवीत असताना सहलीमध्‍ये उनकेश्‍वर पाहण्‍याचा योग आला होता. त्‍या वेळचे उनकेश्‍वर आणि आताचे उनकेश्‍वर खुप फरक जाणवला. पहिलं गरम पाण्‍याचे कुंड होतेे. आता ते राहिले नाहीत. नळाव्‍दारे कुंडामध्‍ये गरम पाणी सोडले जाते. उनकेश्‍वराचे दर्शन झाल्‍यावर पुढेे पांढरकवडयाकडे निघालो. आता चांगला   अंधार पडू  लागला. घनदाट झाडी सुरू झाली. एक व्‍यक्‍ती रस्‍त्‍याने चालत येवून घनदाट जंगलात घुसला. अशा जंगलात नागमोडी वळणाची गेलेली वाट. त्‍यावरून चालत गेलेला वाटसरू दाट झाडीत नाहीसा झाला. मनात वाटले असे कसे जीवन असेेल येथील आदिवासींचे. एवढया घनदाट जंगलात कसले जीवन व्‍यतीत करत असतील. या विचारात पांढरकवडयाच्‍या दिशेन चालू लागलो.  

Post a Comment

0 Comments